Saturday, 9 February 2013

आई...

तुझ्याबद्दल काही लिहिण्याइतपत मी मोठा नाही... माझी तेवढी ऐपत ही नाही... तुझं माझ्या जीवनातलं स्थान हे शब्दांच्या पलीकडले आहे... तरीपण कधी कधी काही भावनांना तोंडाद्वारे वाट फुटत नाही अश्यावेळी मग शेवटी शब्दांचाच सहारा घ्यावा लागतो.. आई... आई म्हटलं की मला तीनच गोष्टी कळतात... 'आ'युष्य, 'अ'र्थ आणि 'ई'श्वर ... शब्दांना असो की आयुष्याला जोपर्यंत त्यांना 'अ'र्थ लाभत नाही तोपर्यंत ते निरर्थकच राहतात, पण जेंव्हा त्यांना 'अ'र्थ लाभतो तेंव्हा शब्दांची 'कविता' अन आयुष्याचं 'जीवन' होतं.. आई तु फक्त मला जन्म नाही दिलास... माझ्या 'आ'युष्याला 'अ'र्थ देऊन मला 'जीवन' देणारी सुद्धा तुच... आणि 'ई'श्वर तर मी कधी प्रत्यक्ष पाहिलाच नाही... इतरांसारखं मला दगडात देव पाहता आलं नाही म्हण की मग मलाकधी तशी गरजच पडली नाही म्हण... कारण जेंव्हा जेंव्हा मला तशीगरज भासली तेंव्हा तेंव्हा माझ्याकडे, माझ्यासाठी, तु होतीस आई.. देवांनी पण काय.. रंग वाटून घेतलेत... पण एक तूच जीनी मला निरपेक्ष प्रेम करायला शिकवलं... बाकी बाहेर जगात तर काय सगळं ' व्यावहारिकचं'.. त्याच व्यावहारिक जगात जातांना मग या घाबरलेल्या बिथरलेल्या जीवाला हाथ पडून धीर देणारी सुद्धा तूच आई... तूच मला जगायला शिकवलस, तूच मला परिस्थितीशी लढायला शिकवलस... कोणातरी आपल्यासाठी जीव ओतून जगणंही मला तूच शिकवलस... म्हणून माझ्यासाठी ईश्वर सुद्धा तूच आहेस आई... म्हणून माझ्यासाठी ईश्वर सुद्धा तूच आहेस आई !!!!

No comments:

Post a Comment