लहानपणी आकाशातले तारे मोजण्याचा 'प्रयत्न' केलाय का कधी...
I'm sure आपल्यातल्या प्रत्येकाने असा प्रयत्न एकदातरी केलाय...
कारण लहानपणी ना एखादी गोष्ट होऊशकत नाही असं आपल्याला कोणी शिकवलेलं नसतं... त्यावेळी संपूर्ण आभाळ आपलं असतं... पण जसं जसं आपण मोठे होतो तसं तसं काय काय होऊ शकत नाही हे आपल्या मनावर गिरवण्याचा उठाठोप सुरु होतो... आणि "प्रयत्नांती परमेश्वर" म्हणणारी हीच बुद्धिवंत मंडळी आपल्याला, आकाशातले तारे कुठे मोजता येतात का, वेडा ... असं म्हणून "वेड्यात" काढते...
मग नंतर आपणही लोकं काय म्हणतील या भीतीने 'प्रयत्न' सुद्धा करणं टाळतो !!
0 comments:
Post a Comment