Free Facebook Likes | Twitter Tweets Followers

अनोळखी वाटेवर असं 'एकटं' आणि दिशाहीन चालून ... अन अर्थहीन प्रश्नांना सगळ्यांच्या 'उगाच' टाळत राहून ... दमलोय मी आता .. सगळ्यांना 'समजावून' घेऊन ... ज्यांना जे जे 'हवं' त्यांना ते ते देऊन ... अन तुटून विखुरलेल्या माझ्या अंतरंगाचे तुकडे पुन्हा पुन्हा साचवत ठेऊन ... दमलोय मी आता ... उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहून ..तिच्या आठवात संपूर्ण रात्र जागा राहून ... दिवस-रात्र स्वतःच्याच विचारांशी भांडून... अन त्याच त्याच शब्दांना पुन्हा एकदा कवितेत मांडून .. दमलोय मी आता ... परिस्थितीशी झगडून .. अनवाणी रखडून ... नको तिथे वाकून ... डोळ्यातलं दुखंझाकून ... वाट बघून .. उपेक्षा भोगून .. श्वास मोजून .. स्वतःला हरवून .. खरंच खूप दमलोय मी आता .. हे असलं जगणं जगून ... खरंच खूप दमलोय मी आता .. हे असलं ..!!!!

0 comments:

Post a Comment

 
Top